Pune : कांदा अनुदान मिळविण्यासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याची मुदत

एमपीसी न्यूज – लाल कांद्याची कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्रांकडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री (Pune) केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानासाठी 20 एप्रिल पूर्वी संबंधित बाजार समितीकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन सहकार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Pimpri :  महामानवांनी विषमतेविरुद्ध लढ दिला – डॉ. नागेश गवळी

कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्राकडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.(Pune) शेतकऱ्यास साध्या कागदावर देखील विहीत माहिती नमूद करुन कागदपत्रे जोडून अर्ज करता येईल, असे सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) चे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी माहिती दिली.

 

अर्जासोबत ही कागदपत्रे जोडा –

 

  • कांदा विक्री पट्टीची मूळ प्रत

 

  • कांदा पीक पेरा नोंद असलेला 7/12 उतारा

 

  • शेतकऱ्याचे बँक खातेपुस्तकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत ( आयएफएससी कोड व खाते क्रमांक तपशीलासह)

 

 

अर्ज मिळण्याचे ठिकाण –

कांदा अनुदान अर्जाचा नमुना कृषि उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार, शेतकरी, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड खरेदी केंद्र येथे सर्व शेतकऱ्यांना निःशुल्क उपलब्ध होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.