Pimpri :  महामानवांनी विषमतेविरुद्ध लढा दिला – डॉ. नागेश गवळी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महामानवांना समजून घेण्यासाठी लोकांनी महात्मा जोतीराव फुले यांना समजून घेणे आवश्यक आहे.  महात्मा फुले यांचे विचार अमलात आणणे ही काळाची गरज आहे, (Pimpri) महापुरुषांचा लढा हा सामजिक समतेचा लढा होता. प्रत्येक महामानवाने विषमतेविरुद्ध लढा दिला. त्यांचे विचार तळागळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून होत असल्याचे मत डॉ. नागेश गवळी यांनी मांडले.

 क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने 11 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या दिवशी “शिव फुले, शाहू, आंबेडकरांचा क्रांतिकारी लढा” या विषयावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

Pune : उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा; विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन

यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक डॉ. पवन साळवे, विशेष अधिकारी किरण गायकवाड,  वासिम खुरेशी, माजी शहर सुधारण समिती सभापती अनुराधा गोरखे, कामगार नेते निवृत्ती आरवडे, तुकाराम गायकवाड, उत्तम कांबळे,  हनमंत माने, सुरेश गायकवाड , अॅड. विद्या शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचे महत्वाचे साधन शिक्षण होय म्हणून महात्मा फुले यांनी अस्पृश्य आणि स्त्रियांसाठी शाळा उघडल्या. शिक्षणाद्वारे स्त्रियांना आणि अस्पृश्याना गुलामगिरीतून मुक्त केले.(Pimpri) तसेच महापुरुषांनी देशातील सर्व समाज घटकांसाठी कार्य केले आहे,  महामानवांना जाती, धर्माच्या चौकटीत बंधिस्त करणे हे महामानवांचा पराभव ठरेल असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.