BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शेतकऱ्यासह कुटुंबाचे हात पाय बांधून जबरी दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

1,165
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांच्या हद्दीत 12 मार्च रोजी मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून शेतकरी कुटुंबियांचे हात पाय बांधून मारहाण करीत दरोडा टाकणा-या चौघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सोमनाथ विठ्ठल माने (रा.धायरी), प्रवीण विलास दोडमिसे (वय 25), सागर निलाप्पा गायकवाड (वय 23), संभाजी उर्फ संभू सीताराम गोरे (वय 30) या चौघांना अटक केली आहे. तसेच त्यांचा साथीदार अशोक उर्फ बाबुराव नाना गायकवाड (रा. निजामाबाद, हैदराबाद) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

धायरीतील रायकर मळा परिसरात शेतामध्ये विशाल बाळु पोकळे यांचे घर आहे. दि. 12 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सात जणांनी त्यांच्या घराचा दरवाजा मोठ्या दगडाने तोडून आत प्रवेश केला. तसेच विशाल यांची आई, वडील पत्नी यांचे हात पाय दोरीने बांधून सर्वांना काठीने मारहाण केली.तसेच घरातील सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम दुचाकी आदी साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला होता. बाळु पोकळे यांनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हात पाय सोडवून घेत पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक दरोडेखोरांचा शोध घेत होते. दरम्यान, पोकळे यांच्याकडे चिंचेची झाडे घेण्यासाठी येणा-या सोमनाथ माने याने हा गुन्हा केल्याची माहिती पथकास मिळाली. त्याला धायरी गावातून ताब्यात घेतले कसून चौकशी केली असता त्याने इतर चार साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले.

आरोपी सोमनाथ माने वगळता इतर चारही आरोपी हे बांधकाम प्रकल्पावर कामे करतात. पोकळे यांचे घर शेतात असून तेथे दूरवर लोकवस्ती नाही तसेच त्यांच्याकडे रोज दूध, भाजीपाला विक्रीतून रोख रक्कम येते याबाबत सोमनाथ याला माहिती होती. त्याने दागिने तसेच पैसे चोरीच्या इराद्याने इतर आरोपींच्या मदतीने घरावर दरोडा टाकला

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3