Pune : तुला माझीच गाडी दिसली का? असे म्हणत पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर धरली

एमपीसी न्यूज : ऐन वाहतुकीच्या वेळी भर रस्त्यात चार चाकी गाडी (Pune) उभी करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची हुज्जत घातली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर धरून दमदाटी केली. हा संपूर्ण प्रकार विमान नगर परिसरात शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी एका कारचालकाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

अभिनंदन सखाराम गायकवाड (वय 37, कुमार प्राईम वेरा साईनाथ नगर वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र डावरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे या आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने विमान नगर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवत होते. यावेळी अभिनंदन गायकवाड हा आपली चार चाकी गाडी घेऊन रस्त्यात थांबला होता. यावेळी विलास सोंडे यांनी त्याला गाडी रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. यावरून त्याने विलास सोंडे यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

तुला माझीच गाडी दिसली? का इतर गाड्या (Pune) दिसत नाही का असे बोलत वाद घालण्यास सुरुवात केला. यावेळी फिर्यादी यांनी ट्रॅफिक जाम आहे गाडी काढून घ्या असे सांगितले. त्यावर आरोपीने मी गाडी काढणार नाही काय करायचे ते करा मी तुमच्याकडे बघून घेतो असे म्हणून फिर्यादी यांची कॉलर ओढली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Pune Crime : काका उठला पुतण्याच्या जीवावर; अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.