Pune: प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत 10 हजार सिलिंडरचे वाटप- अजय खेडेकर

Pune: Distribution of 10,000 cylinders under Pradhan Mantri Ujjwala Gas Yojana - Ajay Khedekar कोरोना संदर्भात सातत्याने जनजागृती करण्यावर भर देण्यात येत असल्याचे अजय खेडेकर म्हणाले.

एमपीसी न्यूज- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक 18 मध्ये आतापर्यंत 10 हजार गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती नगरसेवक अजय खेडेकर यांनी दिली.

बुधवारी सकाळी 9 वाजता 10001 वा सिलिंडर आणि प्रभागातील डॉक्टर्स, क्लासेस, सोसायट्यांना 250 सॅनिटायजर स्टँडचे वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे उपस्थित राहणार आहेत.

नगरसेवक अजय खेडेकर यांचे जनसंपर्क कार्यालय, खडकमाळ आळी राष्ट्रभूषण चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे. सध्या संपूर्ण देशासह पुणे शहरातही कोव्हिड- 19 म्हणजेच कोरोनासारख्या गंभीर आजाराने थैमान घातले आहे.

त्यासाठी शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांना अनेक जीवनावश्यक सोई सुविधांचा अभाव जाणवत आहे. अशा परिस्थितीत आम्ही घरोघरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.

कोरोना संदर्भात सातत्याने जनजागृती करण्यावर भर देण्यात येत असल्याचे अजय खेडेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.