Pune :मॉलमध्ये मराठी पाट्या लावण्याबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मॉलमध्ये (Pune)अजूनही इंग्रजी पाट्या दिसत आहेत. त्या ठिकाणी मराठी भाषेत पाट्या लावण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद यांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Vadgaon : सततच्या खंडित वीजपुरवठ्याला कंटाळून व्हॅलेंटाईन डे दिवशी महावितरणच्या अधिकाऱ्यांना गुलाबपुष्प आणि मागणीचे निवेदन

 

नोव्हेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व (Pune)आस्थापनांमध्ये मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत आदेश दिले आहेत. असे असतानाही पुणे जिल्ह्यातील अनेक मॉलमध्ये अजूनही इंग्रजी भाषेत पाट्या लावलेल्या आहेत. हे मॉल प्रशासन न्यायालयाच्या आदेशाला जुमानत नाही. पिंपरी चिंचवड शहरातील एल्प्रो सिटी मॉल तसेच डेक्कन मॉल, फिनिक्स मॉल, लाईफस्टाईल मॉल अशा अनेक मॉल प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित मॉल प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत सांगण्यात यावे, अशी मागणी प्रदीप नाईक यांनी केली होती. यामुळे मराठी भाषेचा आदर आणि मराठी संस्कृतीचा सन्मान वाढेल अशी आशा नाईक यांनी व्यक्त केली.

या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार वस्तूस्थिती तपासून योग्य ती कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद यांना सांगण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.