Pune : बोलण्यात गुंतवून ज्वेलर्सच्या दुकानातील दागिने चोरले

एमपीसी न्यूज- सोने खरेदी करण्याचा बहाणा करून बोलण्यात गुंतवून ज्वेलर्सच्या दुकानात हातचालाखीने 30 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या चैन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना मंगळवारी (दि.22) दुपारी पावणे चारच्या सुमारास धानोरी लोहगाव रोडवरील जगदंबे ज्वेलर्समध्ये घडली आहे.
याप्रकरणी धानोरी येथील एका 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे धानोरी लोहगाव रोडवर जगदंबे ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने 22 जानेवारी दुपारी पावणे 4 च्या सुमारास दोन महिला (वय अंदाजे 30 ते 35) एका इसमासोबत (वय अंदाजे 30) आल्या. त्यांनी बोलण्यात गुंतवून फिर्यादी महिलेच्या दुकानातील तब्बल 30 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या चैन हातचालाखीने चोरून नेल्या.
पोलीसांच्या हाती तपासात सीसीटीव्ही फुटेज लागले आहे, याच्या आधारे आरोपी मिळण्यास मदत होईल.

याप्रकरणी दोन अनोळखी महिला आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.