Pune : बाणेर येथील उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेट उघडकीस; 3 परदेशी मुलींची सुटका

एमपीसी न्यूज – उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा मसाज सेंटरच्यानावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसावर पोलिसांनी काल मंगळवारी (दि.29) छापा टाकून तीन परदेशी मुलींची सुटका करून मालकाला अटक केली आहे. जयदीप रवींद्र अनेचा (वय ३६, रा, टिंगरे नगर) असे अटक करण्यात आलेल्या स्पा मालकाचे नाव आहे. बाणेरमधील ‘बेसील हौसिंग सोसायटी’ येथील ‘जिरना थाई स्पा सेंटर’मध्ये हा वेश्या व्यवसाय सुरू होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील एका सोसायटीमध्ये स्पाच्या नावाखाली परदेशी थेरेपिस्ट मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसानी छापा टाकून थायलंड देशातील 2 आणि लावोस देशातील 1 अशा एकूण तीन मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली.

तसेच मुलींना वेश्याव्यवसायास लावणाऱ्या स्पाच्या मालकास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाई दरम्यान 7 हजार 200 रुपयांची रोकड, 2 मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलींना महंमदवाडी येथील रेस्क्यू होम येथे संरक्षणकामी ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.