Pune : तळीरामांच्या बाटल्यांपासून बनवला ‘मासा’

एमपीसी न्यूज – औंध येथे राजीव गांधी पूलाजवळ नदीपात्रात दर शनिवारी व रविवारी जिवित नदीमार्फत स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. दि. 30 नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिका व जिवित नदी व अन्य संस्था मिळून संपूर्ण नदी किनारी स्वच्छता मुठाई मुळाई महोत्सव अंतर्गत करण्यात आली. यामध्ये महिनाभर औंध येथे तळीरामांनी टाकलेल्या नदी किनारच्या रिकामा बाटल्या गोळा करण्यात आल्या.

एकत्रित बाटल्या संकलित करून माशाची आकृती करण्यात आली. कचरामुक्त पुणेचा यावेळी संकल्प करण्यात आला, अशी माहिती पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

दरम्यान, मुळा – मुठा नदी स्वच्छ राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.