Pune : साथी किशोर पवार प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांचे स्वागत

एमपीसी न्यूज- साथी किशोर पवार प्रतिष्ठानतर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सेवा दिंडी ट्रस्टच्या वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. 

यामध्ये प्रामुख्याने १५० ऊस तोड कामगार आहेत.  या  वारकऱ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था एस.एम. जोशी फाऊंडेशन मध्ये करण्यात आली. या उपक्रमाचे १९ वे वर्ष होते. ‘साथी किशोर पवार  प्रतिष्ठान ‘ चे विश्वस्त किरण ठाकूर, श्रीमती वंदना पवार,  अॅड. संतोष म्हस्के,  मंगल देडगे तसेच दिंडी प्रमुख ह.भ.प. रवींद्र तावरे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.