Pune : माजी आमदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक महिन्याचे मानधन द्यावे -बाळासाहेब शिवरकर

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने महाराष्ट्रातील सर्व विधानसभा – विधानपरिषदेच्या माजी आमदारांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे, असे आवाहन माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी केले आहे.

यापूर्वी कधीही नव्हती अशी गंभीर परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाली आहे. दररोज राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. महाराष्ट्र सरकर विविध उपाययोजना करीत आहे. त्यासाठी आता लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंध देशभरात 21 दिवसांचा लोकडाऊन जाहीर केला आहे. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, अद्यापही काही नागरिक रस्त्यावर फिरत असल्या बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे शहरात दोन ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.