Pune : अजित दादाना मुख्यमंत्री होताना पाहायचं – रुपाली चाकणकर

एमपीसी न्यूज – अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम (Pune) करावं लागेल,आमचं स्वप्न आहे,  त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, दादांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वांची इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर आज म्हणाल्या. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या.

गेल्या वर्षी  2023 ला विकासासाठी अजितदादांनी अनेक चांगले निर्णय घेतले . दादांवर बोलणाऱे दोन्ही खासदार खरं तर दादांमुळेच निवडून आले आहेत. त्यांना राजकारण हवं आहे.  सुप्रीया ताई गेली 15 वर्षे अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत.भावनिक राजकारण जास्त वेळ चालत नाही.बारामतीमध्ये अजित पवारांचाच (राष्ट्रवादी गट ) आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल.

Alandi : नववर्षानिमित्त आळंदीत भाविकांची गर्दी

18 जानेवारीला मुबंईत महिला मेळावा आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच तृतीयपंथीयासाठी ससून मध्ये स्वतंत्र वॉर्ड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रत्येकाची लढण्याची इच्छा असते, त्यामुळे आगामी निवडूकीसाठी खडकवासला मतदार संघातून अनेक  जण इच्छुक आहेत, असे त्या (Pune) म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.