Lonavala Corona Update : आयएनएस शिवाजी प्रशिक्षण केंद्रात आणखी चार तरुणांना कोरोनाची लागण

Four more youths infected with corona at INS Shivaji Training Center 'आयएनएस शिवाजी'मधील कोरोना रुग्णांची एकूण  संख्या अकरा

एमपीसी न्यूज : भारतीय नौदलाचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजी येथे चार तरुणांचा कोरोना तपासणी अहवाल आज, मंगळवारी पाॅझिटिव्ह आल्याने येथिल रुग्णांची संख्या अकरा झाली आहे. त्या सर्वांवर पुण्यातील कमांड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चार दिवसापूर्वी येथिल चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर काल तिन जणांचे कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले होते. आज नव्याने चार जणांना लागण झाली आहे. कुरवंडे गावातील आयएनएस शिवाजी हे भारतीय नौदलाचे प्रशिक्षण केंद्र आहेत.

भारताच्या विविध भागातून नौदलात दाखल झालेल्या तरुणांना येथे विविध प्रकारचे समुद्री प्रशिक्षण दिले जाते. उत्तरप्रदेश, हरियाणा, आंद्रप्रदेश अशा विविध भागातून याठिकाणी 10 जुन रोजी प्रशिक्षणार्थी तरुणांची मोठी तुकडी दाखल झाली आहे.

हे सर्व तरुण क्वारंटाईन असताना त्यांच्यापैकी तिघांना सुरुवातीला त्रास जाणविल्याने त्यांची कोरोना तपासणी केली असता अहवाल पाॅझिटिव्ह आले.

त्यांच्या संपर्कातील इतरही काही तरुणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या अकरावर गेली आहे. आयएनएस शिवाजीमधील प्रशिक्षणार्थी तरुणांची वाढती कोरोनाची साखळी रोखणे गरजेचे आहे.

रुग्णांची वाढती संख्या आयएनएस शिवाजीप्रमाणे लोणावळा व कुरवंडे ग्रामस्तांची चिंता वाढविणारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.