Pune : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्याअध्यक्षपदी गणेश काळे; सचिवपदी मनीषा गोसावी

एमपीसी न्यूज – विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या (Pune)अध्यक्षपदी गणेश बबनराव काळे, उपाध्यक्षपदी अनिल ज्ञानदेव खेतमाळीस, सचिवपदी मनीषा गोसावी, खजिनदारपदी ॲड. देविदास टिळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2024 ते 2027 या कालावधीकरिता कार्यकारिणी निवडण्यात आली.

 

Mahalunge : प्रेमासाठी पतीला सोडलेल्या महिलेची प्रियकराने केली हत्या

या पदाधिकाऱ्यांसमवेत माजी विद्यार्थी जीभाऊ शेवाळे, (Pune)निसार चौगुले, शंकर बारवे, जे. व्ही. इंगळे, पुष्पा आरोटे, संदीप इंगवले, संभाजी सातपुते यांची विश्वस्त म्हणून निवड झाली. स्वीकृत विश्वस्त म्हणून सुनील चोरे, मनोज गायकवाड, दिनकर वैद्य, अलकनंदा पाटील, ⁠सीए संतोष घारे, ⁠डॉ. अभय व्यवहारे यांची नेमणूक करण्यात आली.

कुंदन पठारे, श्रुती साने, सचिन मोकाशे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, नंदकुमार तळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, प्रभाकर पाटील व अन्य माजी विद्यार्थी, पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

मंडळाने आतापर्यंत कोरोना काळात अन्नदान, कोकणात पूरग्रस्त विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप, आशीर्वाद वृक्ष योजना, दिवाळी फराळ वाटप, रक्तदान शिबिरे, समितीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना वैयक्तिक आर्थिक मदत, उद्योजकता विकास मार्गदर्शन, रक्षाबंधन, मुला-मुलींचे नियमित वार्षिक स्नेहसंमेलन (मेळावे) असे अनेक उपक्रम राबविले आहेत.

“मंडळाचे स्थापनेपासून प्रेरणास्तोत असलेल्या दिवंगत रमाकांत तांबोळी यांच्या अपेक्षेप्रमाणे, समितीच्या माजी विद्यार्थ्यांचे यथायोग्य संघटन करून त्यांना पुन्हा समितीच्या मुख्य कार्यप्रवाहात आणण्यासाठी व सर्व प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत अग्रेसर कार्य करण्याचा प्रयत्न आहे,” असे नवनियुक्त अध्यक्ष गणेश काळे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.