Pune : भगतसिंग, राजगुरु, बटुकेश्वर दत्त यांच्या वंशजांच्या हस्ते ‘व्हायरल माणुसकी’ च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – शहीद भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू, (Pune)बटुकेश्वर दत्त यांच्या वंशजांच्या हस्ते वैभव वाघ लिखित ‘व्हायरल माणुसकी’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

डिसेंबर महिन्यात परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंग यादव ह्यांच्या हस्ते पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन झाले होते. प्रसंगी सरहद संस्थेचे संजय नहार उपस्थित होते.

Pune : चांगल्या समाज निर्माणासाठी बंधुतेची शिकवण मोलाची – कृष्णकुमार गोयल

वैभव वाघ म्हणाले, “पहिल्या आवृत्तीला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की, महिन्याच्या आत दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करावे लागले. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, आणि बटुकेश्वर दत्त यांच्या वंशजांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणे, ही अभिमानाची गोष्ट आहे.

भगतसिंग यांचे पुतणे किरणजीतसिंग, राजगुरुंचे नातू सत्यशिल राजगुरु (Pune)आणि बटुकेश्वर दत्त ह्यांच्या कन्या भारती दत्त यांचा आशीर्वाद मला मिळाला. यावेळी क्रांतीकारकांच्या या वंशजांकडून त्यांच्या आठवणी, त्यांचे मैत्रीचे किस्से ऐकू शकलो. त्यांच्याशी संवादाचे दोन तास भारावून टाकणारे, विचारप्रवृत्त करणारे होते.”

न्यू ईरा पब्लिकेशन हाऊसच्या माध्यमातून ही ‘निगेटिव्ह काळातील पॉझिटीव्ह गोष्ट’ महाराष्ट्रभर पोहचली असून, वाचकांना आवडली आहे. सकारात्मक चळवळीत काम करायला लावणारी ही गोष्ट आहे. वैभव वाघ यांचे ‘व्हायरल माणुसकी’ हे केवळ पुस्तक नव्हे, तर लोकचळवळ आहे, अशा शब्दात मान्यवरांनी गौरव केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.