Pune Ganeshotsav: गणेशोत्सवात मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपक वापरासाठी 5 दिवस परवानगी

एमपीसी न्यूज : सार्वजनिक गणेश मंडळाला (Pune Ganeshotsav) ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी 5 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केला आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास 4 ऐवजी 5 दिवस परवानगी देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

Sports News : महिला फुटबॉल लीगसाठी अस्पायर एफसी सज्ज

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सुट दिलेल्या गणेशोत्सवाखेरीज इतर सण, उत्सव तसेच ठेवून जिल्ह्यातील गणेशोत्सवासाठी (Pune Ganeshotsav) शनिवार, 3 सप्टेंबर, रविवार, 4 सप्टेंबर, मंगळवार 6 सप्टेंबर, बुधवार 7 सप्टेंबर आणि शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत एकूण 5 दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.