Ganeshotsav Metro :  गणेशोत्सव काळात वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गावर मेट्रो रात्री दोन तास जास्त धावणार

एमपीसी न्यूज : गणेशोत्सव काळासाठी वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गावर मेट्रो रात्री दोन तास जास्त धावणार आहे. (Ganeshotsav Metro) अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली आहे. गणेशोत्सवात मेट्रो प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोनवणे म्हणाले की, गणेश भक्त रात्री उशिरापर्यंत पुण्यातील विविध गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी व तेथील गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी शहरभर फिरत असतात. त्यांना घरी परतण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी महामेट्रो ट्रेन्स दोन तास अधिक धावतील. या दोन तासात मेट्रो ट्रेनच्या पाच फेऱ्या होतील.

Crime News : गुटखा विक्री प्रकरणी काळभोरनगर येथून एकाला अटक

ते म्हणाले की महा मेट्रो सध्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर सकाळी 8 वा पासून रात्री 9 वा पर्यंत धावतात. या कालावधीत मेट्रोच्या 27 फेऱ्या होतात.(Ganeshotsav Metro) नवीन निर्णयानुसार आता मेट्रो ट्रेन सकाळी 8 वा पासून रात्री 11 वा पर्यंत धावतील. या कालावधीत 32 फेऱ्या होतील. अनंत चतुर्दशी म्हणजेच सप्टेंबर 9 पर्यंत मेट्रो ट्रेन या रात्री नऊ ते रात्री 11 पर्यंत धावतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.