Amit Shah : मुंबईवर फक्त भाजपचेच वर्चस्व हवे : शहांनी दंड थोपटले

एमपीसी न्यूज – मुंबईवर फक्त भाजपचंच वर्चस्व राहिले पाहिजे, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी भाजपच्या पदाधिकारी यांना दिले. या वेळी त्यांनी शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्यावरही हल्ला केला. शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचेही ते म्हणाले. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाल्याचे म्हणजे फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडल्याचे शहा यांनी या वेळी सांगितले. उध्दव ठाकरे यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे. बीएमसीसाठी भाजप शिंदे गटाचं 150 चे टार्गेट असून, खयाली पुलावामुळे शिवसेनेची सध्याची अवस्था झाल्याचं शहा म्हणाले.

आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केलं नाही उध्दव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला. राजकारणात धोका देणार्यांचे राजकारण यशस्वी होत नाही. एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ते आपल्यासोबत आहेत. राजकारणात धोका सहन करु नका असे म्हणत बीएमसी जिंकण्यासाठी तयारीला लागा असे आदेश शहा यांनी पदाधिकारी यांना दिले. आपल्याला हिंदूविरोधी राजकारण संपवायचे आहे, बीएमसीसाठी भाजप शिंदे गट यांचे 150 चे टार्गेट असून, मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचाच होणार असा विश्वास व्यक्त करीत शहा म्हणाले की, आपली ही शेवटची निवडणूक आहे असं समजा, कारण अभी नही तो कभी नही, असे शहा म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना

बंडखोरीनंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद सुरु असून, त्यावर अद्यापपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा पेच कायम आहे. मात्र, शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप करीत एकनाथ शिंदे यांची सेनाच खरी शिवसेना असल्यांच शहा यांनी म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.