Pune news : गणेश विसर्जन मिरवणुकीत चित्ररथाद्वारे तंबाखू दुष्परिणामविषयी जनजागृती

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय आणि भारत सरकार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भोई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी रोड येथील मुख्य गणेशोत्सव मिरवणूकीत ‘तंबाखू व तंबाखूचे दुष्परिणाम’(Pune news) या विषयावर चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली आहे.

Pune news : 12 सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

या उपक्रमासाठी मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळाचे सहकार्य लाभले आहे.(Pune news) या चित्ररथात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी, क्रीडा, प्रशासन आदी क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होणार आहेत. ‘तंबाखू व तंबाखूचे दुष्परिणाम’ या विषयावरील जिवंत देखावा असलेला चित्ररथ या जनजागृतीसाठी साकारण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.