Today’s Horoscope 8 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – Today’s Horoscope 8 September 2022

वार – गुरुवार.

08-09-2022

शुभाशुभ विचार- शुभ दिवस.

आज विशेष – प्रदोष.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल- दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र- 13.46 पर्यंत श्रवण नंतर धनिष्ठा.


आजचे राशिभविष्य

*मेष – शुभ रंग- लाल*

कार्यक्षेत्रातील ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत. अधिकार योग चालून येतील सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. पिताश्री आज तुम्हाला योग्य सल्ले देणार आहेत. आज मित्रांना थोडे दूरच ठेवा

*वृषभ- शुभ रंग- पिस्ता*

उद्योग धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्याच्या मागे धावू नका. प्रलोभने टाळा स्वतःवर संयम ठेवा. विरोधकांना कमजोर समजू नका.

*मिथुन- शुभ रंग- डाळिंबी*

आजचा दिवस उद्योग धंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस आहे. त्यामुळे मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. कायद्याची चौकट मोडू नका. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मन शांती मिळेल.

*कर्क- शुभ रंग- मोतिया*

आज सगळी महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.

*सिंह -शुभ रंग- आकाशी.*

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच असेल जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील मतभेद दुपारनंतर निवळतील.

*कन्या- शुभ रंग- डाळिंबी.*

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ लाभेल दुपारनंतर काही बिकट प्रश्न सोडवावे लागतील आज हितशत्रू तुमच्या चुका शोधत आहेत जरा सतर्क रहा.

*तूळ- शुभरंग- आकाशी.*

काहीशा मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आज आपल्या मतावर ठाम राहणार आहात. स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल.

*वृश्चिक- शुभ रंग- लेमन*

नवीन व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा.

*धनु- शुभ रंग- पांढरा*

आज तुमचे मनोबल उत्तम असेल कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवला तर अनेक किचकट कामे सोपी होतील.

*मकर- शुभरंग- मरून*

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झोपणारी कामे स्वतःहून स्वीकाराल व ती पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. थोडे इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा

*कुंभ- शुभरंग- जांभळा*

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे आज एकाच्या भरोशावर दुसऱ्या शब्द देऊ नका. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या.

*मीन- शुभरंग- स्ट्रॉबेरी*

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील सहकारी तुमच्या मताचा आदर करतील अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा.

 

 

      शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

  फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.