Pune : गुड न्यूज ! एक दिवसाचे अर्भक कोरोनामुक्त

Good news! One day old baby corona free : त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे  महापौरांनी अभिनंदन केले आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढल्याने रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत पुणेकरांसाठी एक गुड न्यूज आली आहे. जन्माला आल्यावर पहिल्याच दिवशी कोरोनाची बाधा झालेल्या नवजात अर्भकाने कोरोनावर मात केली आहे.

त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे महापौरांनी अभिनंदन केले आहे.

पौड फाटा परिसरातील कोरोनाबाधित महिलेसह तिच्या नवजात अर्भकाला 20 जुलैला ससूनमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या अर्भकाचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये या नवजात अर्भकालाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान, कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर आता महापौरांनी पुणेकरांसाठी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट आणि पुणे महापालिका यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.

त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंटच्या सरदार पटेल रुग्णालयात 50 ऑक्सिजन आणि 10 आयसीयू बेड्स उपलब्ध पुणे महापालिका हद्दीतील रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत.

पुणे शहरात वेळीच उपचार घेऊन 29 हजार 489 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 1182 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाचे 49 हजार 217 रुग्ण झाले आहेत. त्यात सक्रीय रुग्ण 18 हजार 546 आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.