Pune : लवकरच होणार हडपसरची वाहतूक कोंडी सुरळीत; पुणे माहापालिका अधिकाऱ्यांकडून आढावा

एमपीसी न्यूज – काहीच दिवसांपूर्वी हडपसरमध्ये (Pune) वारंवार होणारी वाहतूक कोंडी हा प्रश्न निकाली लावण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे आता पुणे महानगरपालिका प्रशासनाने हडपसर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पाऊले उचलली असून, त्यावर तातडीने पर्याय काढण्यासाठी पुणे महापालिकेचे उपायुक्त विकास ढाकणे व इतर विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असून, येथील नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळून या परिसरातील IT कंपन्या या स्थलांतरित करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे खूप दिवसांनपासून होत असलेली वाहतूक कोंडी सुरुळीत करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेळी आंदोलन मागे घेण्यासाठी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी प्रसाद काटकर यांनी मध्यस्थी करत हडपसरला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी लवकरच सविस्तर बैठक घेऊ असे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या समवेत उपस्थितीत विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Mahavitaran : पश्चिम महाराष्ट्रात 20 हजार ग्राहकांची वीज खंडित; 15.74 लाख वीज ग्राहकांकडे 310 कोटींची थकबाकी

या बैठकीत हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी भागात वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडी बाबत प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून घोरपडी व कोरेगाव पार्क मार्गे मुंढव्यापर्यंत भुयारी मार्ग करण्यात यावा. केशवनगर, मांजरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता अरुंद करण्यात यावा. रस्त्यात येत असलेल्या झाडांच्या फांद्या व महावितरणचेune) (P पोल व डी. पी बॉक्स यांचे व्यवस्थापन करण्यात यावे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या आहे.

दरम्यान, या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शिवसेना पुण्याचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रसाद काटकर व ढवळे तसेच, इतर विविध विभागातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.