Pune : कात्रज डेअरीच्या जागेवरील एमपीजी-1 आरक्षण वगळून डेअरी प्रक्रिया उद्योग आरक्षण कायम करण्यासाठी हरकती सूचनांची सुनावणी

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेने कात्रज डेअरीच्या जागेवरील(Pune) एमपीजी-१ आरक्षण वगळून डेअरी प्रक्रिया उद्योग आरक्षण कायम करण्यासाठी हरकती सूचनांची सुनावणी शहर अभियंता यांच्या कार्यालयात आज आयोजित करण्यात आली होती.

मौजे कात्रज येथील सर्व्हे नं. 130 ते  133ही जागा पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (Pune )मर्यादित कात्रज (कात्रज डेअरी) साठी सन 1969पासून ही मिळकत ही ताबे व वहिवाटीची आहे. महाराष्ट्र शासनाने दुध संघास दुध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्रक्रिया प्रकल्पासाठी दिलेली असुन तदनंतर सन  2013मध्ये जिल्हाधिकारी महसुल शाखा यांनी सदर जागा संघाचे नावे केलेली आहे.

 

एन.डी.डी.बी.मार्फत अनुदानीत मंजुर डेअरी विस्तारीकरणाचा अंदाजे रक्कम रु. 110कोटी रकमेचा प्रकल्प मंजूर झालेला होता. परंतु, हे आरक्षण असल्यामुळे मंजुर डेअरी विस्तारीकरणाला अडचण निर्माण होत आहे. तसेच पुणे जिल्हातील11 तालुक्यातील900 दूध उत्पादक संस्थांचे हजारो दूध उत्पादक शेतकरी कुटुंब, दूध वितरक व संघाचे १२०० कर्मचाऱ्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह संघावर अवलंबुन आहे.

Chinchwad: चिंचवडच्या कलावर्धिनी  डान्स कंपनी ने केले 50 व्या खजुराहो नृत्य महोत्सवात नृत्य सादरीकरण

ज्या व्यक्ती हरकती घेत आहेत हे त्यांची स्वतःची राजकीय लोकप्रियता वाढविण्यासाठी विरोध करत आहेत. पुणे जिल्हा संघ हा शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था असून सहकारातून समृध्दी या तत्वावर संघ कामकाज करत आहे.

या सुनावनीसाठी पुणे जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील संस्थांचे दूध उत्पादक शेतकरी, दूध वितरक, दूध वाहतुकदार, कामगार संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक रहिवाशी खेळाडू तसेच चेअरमन भगवान पासलकर, संचालक गोपाळराव म्हस्के, अरुण चांभारे, चंद्रकांत भिंगारे, राहुल दिवेकर, स्वप्निल ढमढेरे, व्यवस्थापकीय संचालक, मनोज लिमये यांचेबरोबर संघाचे कर्मचारी यांनी एमपीजी-1 आरक्षण उठवून डेअरी प्रक्रिया उद्योग आरक्षण कायम करण्यासाठी सूनावणी वेळी सूचना केल्या आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.