Pune : दुचाकीची दुभाजकाला धडक; दुचाकीस्वार ठार

Hitting a two-wheeler divider; Cyclist killed : हडपसर परिसरात रविवारी सकाळी हा अपघात घडला

एमपीसीन्यूज : भरधाव दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण जखमी झाला. हडपसर परिसरात रविवारी सकाळी हा अपघात घडला.

पवन कुमार (वय 28) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर अँथनी डिसूजा (34) हा गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी हा अपघात झाला. मगरपट्टा चौकातून पवन कुमार आणि अँथनी डिसूजा हे एका दुचाकीवर भरधाव वेगाने जात होते.

यावेळी पवन कुमार याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला जाऊन धडकली.

या अपघातात पवन कुमारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर डिसूजा हा जखमी झाला होता. नागरिकांनी या दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पवन कुमार याला मयत घोषित केले.

अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.