Pune: कोरोनाचे 1817 रुग्ण, 830 जणांना डिस्चार्ज, 29 जणांचा मृत्यू

1817 Corona patients, 830 persons discharged, 29 deaths.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या सोमवारी 6 हजार 918 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1817 रुग्ण आढळले. 830 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या रोगामुळे 29 जणांचा मृत्यू झाला. 591 क्रिटिकल रुग्ण असून त्यात 96 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात कोरोनाचे आता 39 हजार 203 रुग्ण झाले आहेत. शहरात ऍक्टिव्ह रुग्ण 14 हजार 757 आहेत. 23 हजार 441 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

वडगावशेरीतील 89 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर गावठाणात 43 वर्षीय पुरुषाचा, कल्याणीनगरमधील 67 वार्षिक पुरुषाचा, कसबा पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, धानोरीतील 68 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 76 वर्षीय महिलेचा माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर गावठाणामधील 73 वर्षीय पुरुषाचा सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

टिंगरेनगरमधील 78 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 53 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 76 वर्षीय महिलेचा, हडपसरमधील 91 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 52 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 43 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, बी. टी. कवडे रोडवरील 67 वर्षीय महिलेचा, घोरपडी गावातील 62 वर्षीय महिलेचा, कोंढाव्यातील 65 वर्षीय पुरुषाचा, आंबेगाव – धनकवडीतील 65 वर्षीय महिलेचा नायडु हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 67 वर्षीय पुरुषाचा, लोहगावमधील 71 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोहगाव रोडवरील 74 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, विश्रांतवाडीतील 54 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 79 वर्षीय पुरुषाचा, वारजेतील 64 वर्षीय पुरुषाचा, नारायण पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा, आंबेगावमधील 49 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 40 वर्षीय पुरुषाचा आणि 65 वर्षीय महिलेचा सासून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 53 वर्षीय महिलेचा नायडु हॉस्पिटलमध्ये, कर्वेनगरमधील 65 वर्षीय महिलेचा माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.