Pune : पतीच्या संमतीनेच त्याने केला पत्नीवर बलात्कार

एमपीसी न्यूज- पतीच्या संमतीनेच एकाने पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कात्रज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती व अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी पती आणि सुरेश शैशराज शिंदे (वय 34) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सुरेश शिंदे याला अटक केली आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कामानिमित्त कात्रज परिसरातील एका वसतिगृहात पतीसोबत राहत होती. त्याच वसतिगृहात काम करणारा आरोपी सुरेश शिंदे याने फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिने हा प्रकार आपल्या पतीच्या कानावर घातला असता त्याने दिलेले उत्तर ऐकून तिला धक्काच बसला. माझ्याच संमतीनेच त्याने तुझ्यावर बलात्कार केला. मीच त्याला तसे करण्यास सांगितले होते. असे उत्तर त्याने दिले. नोव्हेंबर 2019 मध्ये ही घटना घडली.

फिर्यादी महिलेने नातेवाईकांशी चर्चा करून अखेर भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दिली. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.