Pune : लेडी रमाबाई हॉलमध्ये दि. 28 रोजी संस्कृत संमेलन

एमपीसी न्यूज – वाग्विलासिनी संस्कृत संमेलन (Pune)रविवार दि. 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता संपन्न होत असून याचा समारोप दू. 3.30 वाजता केला जाईल.

स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे संपन्न होणाऱ्या या संस्कृत संमेलनाचे आयोजन संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत पुणे महानगर सिंहगड जनपद आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांचे संयुक्तविद्यमाने करण्यात आले आहे.

 

Pimpri : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने स्त्रियांना ज्ञानमंदिराचे दार खुले – डॉ.अमोल कोल्हे

या एक दिवशीय संस्कृत संमेलनाचे उद्घाटन (Pune)रविवारी सकाळी 10.00 वाजता बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांच्या हस्ते संपन्न होईल. याचे अध्यक्षस्थान संस्कृतभारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांचे प्रांतमंत्री विनय दुनाखे भूषवतील. याप्रसंगी खादी ग्रामोद्योग कमिशनचे अध्यक्ष रवींद्र साठे हे मार्गदर्शन करतील.

यानंतर सकाळी 11.30 ते दू. 1.00 या वेळेत परीसंवादाचे आयोजन करण्यात आले असून वाईच्या किसान वीर महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका अंजली पर्वते अध्यक्षस्थान भूषवतील. या परिसंवादात वैद्य अनंत पाटील, प्रांजली देशपांडे, रमा क्षीरसागर, श्रेया लोणीकर हे सहभागी होत आहेत. यानंतर विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन व संस्कृत गीतरामायण सादर केले जाईल.

दू. 3.30 ते 5.00 या वेळेत या संस्कृत संमेलनाचा समारोप होईल. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक संजय उपाध्ये हे प्रमुख वक्ते असतील. संस्कृतभारतीचे अ.भा. संपर्क प्रमुख श्रीश देवपुजारी हे मार्गदर्शन करतील.

“या संमेलनामध्ये संस्कृत भाषेबद्दल आपल्या मनात असणारे कुतूहल प्रत्यक्षात अनुभवा. यामध्ये लहान मुलांना संस्कृत भाषा बोलताना पाहू शकता, संस्कृत भाषेचा इतिहास, भाषेतील विज्ञान, साहित्य कला अश्या अनेक विषयां बद्दल जाणून घ्या”, असे या संमेलनाचा संयोजिक संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत पुणे महानगर सिंहगड जनपदच्या वैखरी कुलकर्णी यांनी सांगितली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.