Pune : गीतांजली कला अकादमी आयोजित ‌‘मांडणी’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज-काळातील आवश्यक शिक्षणासाठी कला महाविद्यालयांकडून काही घडेल अशी सध्या (Pune)  परिस्थिती नाही. व्यावसायिक दृष्टीकोनातून विद्यार्थ्याला शिक्षण देण्यासाठी कला महाविद्यालयांमध्ये अंधार आहे, अशी टीका सुप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केली. बदलत्या काळानुरूप शिक्षण देण्यासाठी छोट्या-छोट्या संस्थाच उपयुक्त ठरू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.विद्यार्थ्यांचा कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा या उद्देशाने गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या गीतांजली कला अकादमीच्या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्र व कलाकृतींचे ‌‘मांडणी’ हे वार्षिक प्रदर्शन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील कलादालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन काल (दि. 30) कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

चित्रकार, बालसाहित्यकार ल. म. कडू, गीतांजली कला अकादमीच्या प्रमुख गीतांजली कडू-मोरे, सौमित्र केमकर आदी उपस्थित होते.

Pune : उलगडले ‘कानडा’ रागाचे वैविध्य

कुलकर्णी पुढे म्हणाले, कला क्षेत्रात ग्राफिक डिझाईनला आजच्या काळात खूप महत्व आहे. या विषयात व्यावसायिक दृष्टीने काम होणे ही काळाची गरज आहे. ग्राफिक डिझाईच्या माध्यमातूनही चित्रकाराला निर्मितीचा आनंद मिळू शकतो. कॅलिग्राफी म्हणजे नुसते फरकाटे नव्हे तर अक्षर ही मांडण्याची गोष्ट आहे. चित्रकाराच्या रचनेमधून त्याचा अभ्यास-विचार व्यक्त होणे गरजचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ल. म. कडू म्हणाले, करिअरसाठी चित्रकला उपयोगी नाही ही परिस्थिती आज बदलली आहे. कला कसे जगायचे आणि का जगायचे हे दाखवित आहे. चित्रकला विषयात चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करणारी आजची पिढी आहे.

मुलांना निसर्गचित्राची गोडी लागावी, निसर्गातील प्रत्येक गोष्टीत दडलेले चित्र कसे बघायचे, शोधायचे हे मुलांना कळण्यासाठी गीतांजली कला अकादमीतर्फे निसर्गचित्रण कार्यशाळा आयोजित केली जाते. दहावी, बारावीनंतर डिझाईन क्षेत्रात करिअर करण्याचा कल वाढला आहे. अग्रगण्य संस्थांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून अचूक व नियोजनबद्ध तयारी करून घेतली जात असल्याचे गीतांजली कडू-मोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

या प्रदर्शनात 5 ते 22 वयोगटातील 100 विद्यार्थ्यांच्या कलाकृती मांडण्यात आल्या असून प्रदर्शन दि. 1 ते 3 जुलै या कालावधीत सकाळी 10:30 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुले असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गोरे यांनी केले तर आभार सई मोरे यांनी (Pune)  मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.