Pune News : राज्यातील इतर शहरांच्या मानाने पुण्यात सर्वाधिक थंडी

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून शुक्रवारी सर्वाधिक नीचांकी तापमान पुण्यात नोंदवले गेले राज्यातील इतर शहरांच्या मानाने पुण्यात सर्वाधिक थंडी पाहायला मिळाली  पुण्याचे किमान तापमान सरासरी 4.8 अंश सेल्सिअसने कमी झाले आहे.

दरम्यान, 12 ते 15 नोव्हेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात पाऊस पडणार आहे.

या भागासाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले असून, हा तीव्र कमी दाबाचा पट्टा तमिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकला आहे.

या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कायम राहणार असून, हा पट्टा तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडील करायकल व श्रीहरी कोटादरम्यान थांबणार आहे. याचदरम्यान दक्षिण अरबी समुद्रात आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

 आज शुक्रवारचे तापमान 

 लोहगाव-14.5, शिवाजीनगर – 11 .9 पाषाण – 12.6 

गुरुवारचे तापमान
पुणे-10.9, नगर-13.2 जळगाव-11.5 कोल्हापूर-18.4 महबळेश्‍वर-13.9 नाशिक-12.2 सांगली-17.1
सातारा-15.4 सोलापूर-15.5 मुंबई-22.5 अलिबाग-19.4 रत्नागिरी-20.8 डहाणू-18.5
उस्मानाबाद-22.5 औरंगाबाद-13.6 परभणी-14 नांदेड-16.2
बीड-13.1 अकोला-14.4 अमरावती-14.4 बुलडाणा-15.2 ब्रह्मपुरी-15.9 चंद्रपूर-17.4 गोंदिया- 12.4 नागपूर-14.5 वाशिम-13.7 वर्धा-13.7 यवतमाळ-12.5

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.