Pune News : पुण्यात येणार बुलेट ट्रेन ! रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण लवकरच

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरसाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पुन्हा सर्वेक्षण करून मार्ग निश्‍चित करावा. त्यानंतर त्याचा समावेश ‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्यात करावा, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

भारतीय हायस्पीड रेल्वे कापोरेशन लिमिटेडने देशभरात आठ ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे हैदराबाद असे दोन प्रकल्प आहेत. त्यापैकी हा एक प्रकल्प आहे. ही ट्रेन ताशी 250 ते 300 या वेगाने धावणार आहे. मुंबई ते हैदराबाद असा सुमारे 711 किलोमीटरचे अंतर आहे. हे अंतर ही ट्रेन साडेतीन तासांत कापणार आहे.

या ट्रेनच्या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे असतील. या रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकण्यात येणार आहे. या रेल्वेचा मार्ग मोठ्या प्रमाणावर पीएमआरडीएच्या हद्दीत जातो. लोणावळ्यापासून पुणे, मांजरी, सासवड या हद्दीतून जातो. तसेच पीएमआरडीएने विकास आराखड्यात ग्रोथ सेंटर प्रस्तावित केले आहेत.

त्यातून हा मार्ग जातो. मात्र विकास आराखड्यात हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला नाही. तो समाविष्ट करावा, यासाठी हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने यापूर्वी पीएमआरडीएला पत्र देखील दिले होते. दरम्यान नुकतीच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पीएमआरडीएचे आयुक्त यांची भेट घेऊन प्रस्तावित विकास आराखड्यात हा रेल्वे मार्ग दर्शविण्यात बाबतच चर्चा केली. त्यानुसार हा मार्ग विकास आराखड्यात दाखविला जाणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.