Janwadi : सुमारे 400 कष्टकरी महिलांना बचत खात्याची भेट

एमपीसी न्यूज – म्हाळूपार्वती प्रतिष्ठान च्या वतीने जनवाडीतील सुमारे ४०० महिलांना पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बचत खाते उघडून देण्यात आले आहे. बिकट परिस्थिति मध्ये हिमतीने घरची जबाबदारी खांद्यावर घेऊन मुलांचे शिक्षण, पालनपोषण, घरकाम करणा-या आदर्श 3 महिलांना पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बचत खाते, एक हजाराचा धनादेश ,सन्मानचिन्ह ,क्यू आर कोड भेट देण्यात आला.

 

महिलादिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन म्हाळूपार्वती प्रतिष्ठानच्या नीलेश निकम यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पूनम शैलेश हेंद्रे, सारिका सहस्त्रबुद्धे, नगरसेविका नीलिमा दत्तात्रय खाडे, राजश्री काळे, रूपटक्के, अरुण सयाजी औचारे,  प्रकाश म्हाळू निकम, विनोद परदेशी, कुणाल हेंद्रे, अमित साळुंके उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.