Pune News : पुण्यात अल्पवयीन मुलांना पाठबळ देणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करणार

एमपीसी न्यूज : शहरात भरदिवसा कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी (Pune News) शक्कल लढवली आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ओढणाऱ्या तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

अल्पवयीन मुलांमघ्ये गुन्हेगारीचे आकर्षण आहे. त्यामुळे अनेक अल्पवयीन मुले परिसरातील गुंड टोळ्यांच्या संपर्कात आली आहेत. समाजात प्रभाव पाडण्यासाठी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळाली आहेत. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ओढणाऱ्या तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करणे तसेच त्यांना समज देण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.पोलीस ठाण्यांच्या पातळीवर अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील सहभागाची माहिती संकलित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. विविध गंभीर गु्न्ह्यात 16 ते 18 वयाेगटातील मुले सामील झाली आहेत.(Pune News) गेल्या सहा महिन्यात 42 गुन्ह्यांमध्ये सामील झालेल्या अल्पवयीन मुलांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून गुन्हे केल्याची माहिती मिळाली आहे.

Chinchwad Bye-Election : …तर पोटनिवडणूक अवघड नाही – अजित पवार

गेल्या वर्षी गंभीर स्वरूपाच्या 303 गुन्ह्यात 476 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. पाेलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे शाखेतील पथकांनी गुन्हेगारी टोळ्यांमधील अल्पवयीन मुलांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.

अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या सराइतांची माहिती घेण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांवर गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सराइतांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.