Pune : आझम कॅम्पस येथे उद्या ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’वर कायदेविषयक चर्चासत्र

एमपीसी न्यूज – आझम कॅम्पस येथे ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’वर उद्या कायदेविषयक चर्चासत्र आयोजित केले आहे. हा कार्यक्रम आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) च्या असेंब्ली हॉलमध्ये शनिवारी (दि.७ डिसेंबर) सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘ए के के न्यू लॉ अॅकेडमी’ च्या वतीने ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप) विषयावर तीस्ता सेटलवाड यांच्या उपस्थितीत कायदेविषयक चर्चासत्र आयोजित केले आहे.

या चर्चासत्रात तीस्ता सेटलवाड यांचे प्रमुख भाषण होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. पी. ए. इनामदार असणार आहेत, अशी माहिती लॉ अॅकेडमीचे प्राचार्य डॉ. रशीद शेख यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.