Pune : महेश काळे आणि संदीप नारायण यांच्या हिंदुस्थानी – कर्नाटक संगीत जुगलबंदीने रसिक भारावले

एमपीसी न्यूज : घटम, मृदुंग, तानपुरा अशा विविध तालवाद्द्यांच्या (Pune) तडफदार साथीने रंगलेल्या हिंदुस्थानी- कर्नाटक संगीत जुगलबंदीने रसिक भारावले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक महेश काळे व अमेरिकेतील संदीप नारायण यांनी सादर केलेल्या या जुगलबंदीला तरुण श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी उत्तरार्धातील पहिल्या सत्रात महेश काळे व अमेरिकेतील संदीप नारायण यांची हिंदुस्थानी – कर्नाटक संगीताची जुगलबंदी रसिकांनी अनुभविली.

तत्पूर्वी कार्यक्रमात मिरज येथील बाळासाहेब मिरजकर व साजिद मिरजकर या मिरजकर बंधूंकडून आर्यसंगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्याकडे दोन विशेष तानपुरे सुपूर्द करण्यात आले. या तानपुऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तबकडी – गळा – दांडी या एकसंध स्वरूपात असून, यांच्या तळाशी कुठेही जोड नाही. अतिशय अनोखी रचना असलेल्या या तानपुऱ्यांच्या निर्मितीसाठी 1 वर्षे कालावधी लागला आहे.

PMPML : पीएमपीएमएल बसचा बोपदेव घाटाजवळ अपघात; 12 जण जखमी

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे सहस्र वर्षांत एकदाच घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सवाईमध्ये गाण्याची संधी मिळत आहे, याचा अतिशय आनंद होत आहे. संदीप आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत मात्र आज तब्बल 15 वर्षांनंतर एकत्र गात आहोत, असे सांगत त्यांनी ढाणी रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. यामध्ये ‘देवी ब्रोवा समयमी दे…’ ही कर्नाटक संगीतातील बंदिश, ‘लंगरवा छंड मोरी बैया…’ ही हिंदुस्थानी संगीतातील बंदिश जलद लयीत ‘मोरे सर से सरक गई गगरी…’ ही मिश्र बंदिश आणि तराणा सादर केला. त्यांनतर ‘कृष्णानी बेगडी बारू’ हे कर्नाटकी संगीतातील उपशास्त्रीय गीत सादर केले. त्यांनी सादर केलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगास रसिकांनी टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी महेश काळे (Pune) यांना राजीव तांबे (हार्मोनियम), विभव खांडोलकर (तबला), ओंकार दळवी (पखवाज), अपूर्व द्रविड (साइड रिदम), प्रल्हाद जाधव, अमृत छ्नेवार, मनाली जोशी (तानपुरा आणि गायन) यांनी साथसंगत केली. तर संदीप नारायण यांना व्हीव्हीएस मुरारी (व्हायोलिन), साई गिरीधर (मृदंग), चंद्रशेकर शर्मा (घटम) यांनी साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.