Pune : घरात घुसून गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी कुख्यात आरोपी नव्या लोधासह तिघांवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज – घरात घुसून गोळ्या झाडून खून (Pune) केल्या प्रकरणी नव्या लोधा व त्याच्या 3 साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली होती.

टोळी प्रमुख नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा (वय 37 रा. घोरपडे पेठ), गणेश उल्हासराव शिंदे (वय 41, रा., धनकवडी), रोहीत संपत कोमकर, (वय 33 रा. गुरूवार पेठ, पुणे), अमन दिपक परदेशी (वय 29 वर्षे, रा. घोरपडे पेठ) यांना अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी झोपले असताना त्यांचा घराचा दरवाजा वाजवल्यामुळे फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला. दरवाज्या बाहेर उभा असलेल्या नवनाथ ऊर्फ नव्या याने फिर्यादीस ‘तेरा भाई किधर हैं’ असे विचारून उसको बुला असे सांगितले.

फिर्यादी यांनी त्यांचा चुलत भाऊ अनिल यास बाहर कोई आपको बुला रहा है असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी हे किचनमध्ये (Pune ) पानी पिण्यास गेले.. त्यावेळी त्यांनी पाहिले की लोधा याने अनिलला काहीतरी विचारले. त्याचे उत्तर अनिलने मान हलवून नाही असे सांगितले. त्याच क्षणी नव्याने बंदुक काढून फिर्यादीचा चुलत भाऊ अनिल याच्या कपाळावर लावून गोळी झाडून त्याचा खून केला.

Railway : खडकी रेल्वे स्थानकाजवळील फाटक दोन दिवस राहणार बंद

आरोपी लोधा याच्यावर संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी व अवैध मार्गाने जबरी चोरी किंवा दरोडा टाकणे, धमकी देणे किंवा धाक दाखवून जबरदस्ती करून बेकायदेशीर कृत्ये करणे, इतर साथीदारांसोबत खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्याने त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हेगारी केल्याने त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.