Pune : सावकारी कर्जाला कंटाळून एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सावकारी कर्जाला कंटाळून एका(Pune)  व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सन 2016 ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केशवनगर येथे घडली.

राम परशुराम भोसले (वय 51) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राम भोसले यांच्या पत्नीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजेश तावदान, राज तावदान, त्याची पत्नी, सिद्धू मंगवाणी, बलविंदर सिंग, नंदकुमार अडसूळ, शंकर पाटील, त्यांची पत्नी, अजित इरकल यांच्यासह आणखी नऊ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम भोसले यांनी त्यांच्या आईच्या आजारपणासाठी तसेच वैयक्तिक कारणांसाठी त्यांच्या ओळखीच्या राजेश आणि राज तावदान याच्या पत्नीकडून कर्ज काढले होते. त्या कर्जापोटी त्यांनी चार लाख रुपये त्यांना परत (Pune) केले.

Pune : घरात घुसून गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी कुख्यात आरोपी नव्या लोधासह तिघांवर मकोकाची कारवाई

आर्थिक अडचणी आल्यामुळे भोसले यांनी पुन्हा सिद्धू मंगवानी याच्याकडून पाच लाख रुपये कर्ज घेतले. कर्ज देण्याच्या बदल्यात कमिशन म्हणून 50 हजार रुपये देखील त्याला दिले. अन्य आरोपींनी सुद्धा भोसले यांना वेळोवेळी व्याजाने पैसे दिले आणि त्या बदल्या त्यांच्याकडून कमिशन म्हणून लाखो रुपये उकळले. त्यानंतर देखील त्यांच्याकडे वारंवार व्याजाच्या पैशाची मागणी करून घरी येऊन दमदाटी केली. या त्रासाला कंटाळून राम भोसले यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुंढवा पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.