Pune : लॉकडाऊन काळात मार्केटयार्ड बंद : बी. जे. देशमुख

Marketyard closed during lockdown: b. J. Deshmukh

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून दि. 18 जुलैपर्यंत मार्केटयार्ड बंद राहणार आहे.

या कालावधीमध्ये बाजार समितीचे संबधित आडते, हमाल, तोलणार, खरेदीदार, शेतकरी सर्व बाजार घटकांनी पुणे महानगरपालिकेने निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी केले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 10 दिवसांचा अत्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी आज सकाळपासूनच भाजीपाला, फळे मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहेत. यामध्ये सर्वच भाजीपाला दुप्पट दराने विकला गेला आहे.

लॉकडाऊन होणार असल्याच्या बातमीने काही किरकोळ विक्रेत्यांनीही चांगलीच वर कमाई केली. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले.

कोरोनाचे संकट पुणे शहरात गंभीर झाले आहे. रोज 1 हजार रुग्ण वाढते आहेत. सध्या कोरोनाच्या 4 हजार 500 च्या वर चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्ण वाढते आहेत.

शहरात कोरोनाचे आत 27 हजार 525 रुग्ण झाले आहेत. 17 हजार 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जुलै महिन्यात कोरोनाचे संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिकांनी या लॉकडाऊनला सहकार्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.