Pune : वडकीनाला येथे गादी कारखाना आगीत जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडकीनाला परिसरातील गादी कारखान्याला आज (शनिवारी) दुपारी तीनच्या सुमारास (Pune) अचानक आग लागली. या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीतीही जीवीत हानी झालेली नाही.

घटनेची वर्दी मिळताच घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए, कोंढवा, हडपसर,काळेपडळ या अग्निशमन दलाकडून एकुण 7 वाहने दाखल झाली होती.

हा गादी कारखाना एकूण 12 गुंठ्याच्या जागेत पसरला होता. यातील 4 गुंठे जागेतील सामान हे जळून खाक झाले आहे. पाण्याचा मारा करत जवानांनी पाऊण तासात आग पुर्णपणे विझवली.

हि कामगिरी अग्निशम जवान प्रकाश शेलार, बाबा चव्हाण, शौकत शेख, दत्तात्रय चौधरी, चालक समीर तडवी व गायकवाड यांनी केली.

ड्युटीवर नसताना ही बजावले कर्तव्य – Pune

या वर्दीची माहिती मिळताच ड्युटीवर नसताना देखील कात्रज  अग्निशमन केंद्र येथील जवान तेजस मांडवकर यांनी आग विझवण्यासाठी स्वईच्छेने मोठी मदत केली. त्यामुळे त्यांचे नागरिक व अग्निशमनदलाकडून कौतुक कऱण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.