Pune: महापौर मुरलीधर मोहोळ यांचे ट्विटर अकाऊंट हँग
Pune: Mayor Muralidhar Mohol's Twitter account hangs अचानकपणे महापौरांचे ट्विटर अकाऊंट कसे काय हँग झाले, याचा शोध घेण्यात येत आहे.
एमपीसी न्यूज- पुणे शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर मुरलीधर मोहोळ यांचे ट्विटर अकाऊंट हँग झाले होते. महापौर हे पुणे शहरातील कोरोना संदर्भात ताजी माहिती रोज नित्यनियमाने देत होते. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळत आहे. मात्र, अचानकपणे महापौरांचे ट्विटर अकाऊंट कसे काय हँग झाले, याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी काही तासानंतर महापौर मोहोळ यांचे टि्वटर अकाऊंट पुन्हा सुरु झाले.
पुणे शहरात कोरोनाचे 11 हजार रुग्ण झाले आहेत. तर, 6 हजार 906 जण कोरोनातून मुक्त झाले आहे. आतापर्यंत या रोगामुळे 487 जणांचा मृत्यू झाला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ हे सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय असतात. पुणेकरांना जागरूक करण्याचे काम ते करीत आहेत.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका असो की, विविध हॉस्पिटलमधील आढावा असो, नागरिकांना कोरोनापासून जागरूक करण्यासाठी विविध अभ्यासपूर्ण माहिती देत असतात. त्यामुळे महापौरांचे ट्विटर अकाऊंट हँग झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आले.
मागील 4 महिन्यांपासून पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहेत. या काळात महापौरांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नागरिकांना सावध केले आहे. रोज रात्री उशिरापर्यंत कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनाला मार्गदर्शन करीत असतात.