Pune : स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधना दिनानिमित्त स्त्रीरोग निदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधनानिमित्त औंध येथील परमार मल्टीस्पेलिस्टी हॉस्पिटलच्यावतीने स्त्रीरोग निदान महाशिबिराचा पंधरवाडा साजरा केला जात आहे. या शिबिरामध्ये तपासणी, वंध्यत्व स्त्री आणि पुरुषातील ऑपरेशन आणि टेस्टटयूबसाठी, खास सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजीव परमार व डॉ.रचना परमार यांनी दिली.

डॉ. सजीव व डॉ.रचना परमार म्हणाले, परमार मल्टीस्पेलिस्टी हॉस्पिटलमध्ये प्रसूती, स्त्रीरोगशास्त्र, वंध्यत्व, लॅपरोस्कोपी यावर उपचार केले जातात. तसेच पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर असून, वध्यत्व आणि गर्भ महिलांसाठी खास फोर-डी आल्टासांऊड सज्ज आहे. आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून या स्वतंत्रता दिनानिमित्त व रक्षाबंधन दिनानिमित्त महिलांची आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे.

येत्या सोमवारपासून 20 ऑगस्ट पर्यंत महिलांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबिर पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी नाव नोंदविल्यास आरोग्य तपासणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. नावनोंदणीसाठी 8208447690 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.