Pune : मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी काॅंक्रीट रिंग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज- पुणे मेट्राेच्या भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरु होणार असून या कामासाठी काॅंक्रीट रिंग तयार करण्यास सुरवात केली आहे. तसेच टनेल बाेअरींग मशीनची चाचणी यशस्वी झाली असून नाेव्हेंबर महिन्यात या भुयारी मार्गाचे काम सुरू हाेणार आहे. अशी माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे.

शहरांत वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट असे दाेन मेट्राे मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. यापैकी पिंपरी ते स्वारगेट या मार्गापैकी रेंजिहल ते स्वारगेट हा सुमारे पाच किलोमीटरचा मार्ग भुयारी असणार आहे. या भुयारी मार्गात काॅंक्रीट रिंग बसविल्या जाणार असून सहा हजाराहून अधिक रिंग त्या करीता लागणार आहेत. डेक्कन काॅलेज येथील यार्डमध्ये महामेट्राेने २०० िरंग तयार केल्या असुन, सुमारे साडे सहा मीटर परीघाच्या या रिंग आहेत.

भुयार खाेदण्यासाठी चार टनेल बाेअरींग मशीनचा वापर केला जाणार आहे. हे मशीन जसे जसे पुढे जाईल, त्यािठकाणी अातील बाजुने या िरंग बसविल्या जाणार आहेत. या बाेअरींग मशीन संगणकाद्वारे नियंत्रित केल्या जाणार आहेत. या रिंगमध्ये मेट्राेचे रुळ टाकण्यात येतील, तसेच वाहतूक नियंत्रक दिवे, वीज पुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वाहिन्या असतील. प्रत्येक रिंग सहा भागात तयार केली आहे.

टनेल बाेअरींग मशीनची चीनमधील एका कंपनीत चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असून या चाचणीच्या वेळी महामेट्राेचे अधिकारी उपस्थित हाेते. संबंधित मशीनही चीनमधून ऑक्टोबर महिन्यात दाखल हाेईल. त्यानुसार भुयारी मार्गाचे काम प्रत्यक्षात नाेव्हेंबर महिन्यात सुरू केले जाईल. याबाबत महामेट्राेचे महाव्यवस्थापक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांनी समाधान व्यक्त केले. चाचणी यशस्वी झाल्याने भुयारी मार्गाचे काम नियोजित वेळेवर सुरू करता येईल असेही त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.