Pune: ‘हेल्प द निडी’उपक्रमाअंतर्गत 650 पेक्षा अधिक गरजू मुली आणि कुटुंबांना मदत 

एमपीसी न्यूज – पुण्यातील लीला पूनावाला फाऊंडेशन (एलपीएफ) ह्या सामाजिक संस्थेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘कोविड-19 हेल्प द निडी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत गरजू कुटुंबाना मदतीचा हात पुढे  केला आहे. ‘एलपीएफ’ने साडेसहाशेहून अधिक गरजू लीला ज्युनियर्स म्हणजे ज्यांना शालेय शिष्यवृत्ती मिळाली आहे अशा मुली व त्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे करत, एक महिना पुरेल इतके अन्न-धान्य विविध शाळा आणि वस्ती मध्ये जाऊन फिरोझ पूनावाला यांच्या हस्ते देण्यात आले. 

जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. दररोज लाखोंच्या संख्येत लोक या आजाराशी झुंज देत आहेत. भारत सरकारने देशभर लॉकडाउन जाहीर केला असल्याने सर्वांचाच रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे देशाबरोबर महाराष्ट्रातील बरीच कुटुंब आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडली आहेत. दैनंदिन खर्च, अन्न-धान्य, भाजी -पाला या जीवन आवश्यक गोष्टी परवडेनाशा  झाल्या आहेत. त्यामुळे हा उपक्रम हातात घेण्यात आला असून आतापर्यंत साडेसहाशेहून अधिक गरजू मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत देऊ केली आहे.

या उपक्रम राबविण्यासाठी फिरोझ व लीला पूनावाला आणि पुणे पोलिसांच्या विशेष सहकार्य लाभले. पुणे पोलिस आयुक्त, उपआयुक्त आणि निरीक्षक ह्यांचा मदती मुळे हे कार्य यशस्वी रित्यापार पडले. ‘एलपीएफ’चे कार्यकर्ते बाळासाहेब बोराडे,  योगीता आणि सायली यांनी या कार्यात  सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.