Pune: कोरोना चाचण्यांसाठी महापालिका करणार खासगी लॅबसोबत करार

Pune: Municipal Corporation to sign agreement with private lab for corona tests वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्य शासनाने आयसीएमआर मान्यताप्राप्त खासगी लॅबमध्ये स्वतःहून येणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांसाठी 2 हजार 200 रुपये तर, कोरोना रुग्णांच्या घरी जाऊन स्वॅब टेस्ट करण्यासाठी 2 हजार 800 रुपये दर निश्चित केला आहे.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या आणखी वेगाने करण्यासाठी महापालिका आयसीएमआर प्राप्त खासगी लॅबसोबत करार करणार आहे. त्याला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्य शासनाने आयसीएमआर मान्यताप्राप्त खासगी लॅबमध्ये स्वतःहून येणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांसाठी 2 हजार 200 रुपये तर, कोरोना रुग्णांच्या घरी जाऊन स्वॅब टेस्ट करण्यासाठी 2 हजार 800 रुपये दर निश्चित केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्या सोबत झालेल्या बैठकीत जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासगी लॅबधारकांची बैठकही घेतली होती. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोरोना स्वॅब टेस्ट करण्यासाठी आयसीएमआर मान्यताप्राप्त खासगी लॅबशी करार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महापौर, मनपा आणि माननियांच्या ‘स’ यादीतून तसेच सीएसआर निधीतून हा खर्च देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.