Pimpri: पुन्हा लॉकडाउन केला पाहिजे का, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Should it be locked down again, says Devendra Fadnavis ...

एमपीसी न्यूज – लॉकडाउन शिथिल केल्यानंतर राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात लॉकडाउन करण्याची मागणी केली जात आहे. त्याबाबत विचारले असता माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा लॉकडाउन करता येईल अशी परिस्थिती नसल्याचे सांगितले. तसेच कोविड संदर्भातील नियम कसे पाळता येतील यावर भर द्यावा लागले, असेही ते म्हणाले.

फडणवीस यांनी आज, सोमवारी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

त्यामुळे पुन्हा लॉकडाउन केला पाहिजे का,असे विचारले असता फडणवीस म्हणाले, लॉकडाउन करता येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. लोकांची मानसिकता देखील तशी नाही.

लॉकडाउनच्या काळामध्ये व्यवस्थापनाची जी तयारी केली आहे. लोकांची जनजागृती वाढविली आहे. ती अधिक वाढवून आपल्याला लॉकडाउन नसताना देखील कोविड संदर्भातील जे काही नियम आहेत. ते कसे पाळता येतील. याच्यावर जास्त भर द्यावा लागेल.

त्यामुळे पुन्हा लॉकडाउनमध्ये परत जायच्याऐवजी आपल्याला कोरोनाला कसे समोर कसे जाता येईल. कोविड कसा नियंत्रणात आणता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.