Pune : ‘माझी ढाल … माझा मास्क ‘! : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे फोटो वापरून मास्क लावण्याचे पुणे स्मार्ट सिटीचे आवाहन

'My shield ... my mask'! : MP Dr. Pune Smart City's appeal to wear a mask using Amol Kolhe's photo :

एमपीसी न्यूज – ‘ तलवारीला कितीही धार असो, वार अडवायला ढाल लागतेच !, माझी ढाल … माझा मास्क’!
मराठी वृत्तवाहिनीवरील प्रसिद्ध छत्रपती संभाजी महाराज मालिकेत मुख्य भूमिका साकारलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा फोटो वापरून पुणेकरांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये अमोल कोल्हे यांनी स्वतः मास्क लावल्याचे दाखविण्यात आले आहे.

कोरोनात कितीही धार असली तरी मास्क हा एकप्रकारे ढालच आहे. त्यामुळे पुणेकरांनी आवश्यक कामांसाठी बाहेर निघताना मास्क लावण्याचे आवाहनच या जाहिरातीतून करण्यात आले आहे. पुणे स्मार्ट सिटीने केलेल्या या आगळ्यावेगळ्या जाहिरातीचे सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

कोरोना सोबत पुणेकरांचे एकप्रकारे युद्धच सुरू आहे. या काळात मास्क, सॅनिटायजर, फिजिकल डिस्टनसिंग पाळणे ही एक प्रकारची पुणेकरांची ढाल आहे. शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे.

शहरात तब्बल 22 हजार 381 रुग्ण झाले आहेत. तर, 730 नागरिकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत 13 हजार 739 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. 7 हजार 912 ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या संकट काळात पुणे स्मार्ट सिटी कंट्रोल रूम तयार केली आहे. त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आल्याने त्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे यांनीही कौतुक केले आहे. ही कंट्रोल रूम महत्वाचे कार्य करीत असल्याचे सांगण्यात आले.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे स्मार्ट सिटीची अतिरिक्त जबाबदारी आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.