Pune news: नवले पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज: भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ हा घात झाला. अपघातातील मयत व्यक्तीची ओळख मात्र अद्याप पटली नाही.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नवले पुलाजवळ एक व्यक्ती जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी स्वतः मृतदेह उचलून रुग्णवाहिकेतून ठेवला.

दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत्युमुखी पडलेली व्यक्ती मानसिक रुग्ण असावी असे त्याच्या कपड्यावरून दिसत आहे. सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर मुंबई बंगळूर महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.