Pune News: पुण्यात प्रियकर-प्रेयसीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रेयसीचा मृत्यू तर..

एमपीसी न्यूज: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मोहितेवाडी गावात  प्रियकर प्रेयसीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला तर प्रियकराची मृत्यूशी झुंज सुरू आहे. सुषमा दिनकर सोनवणे (वय 22) असे मृत्यू झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. तर प्रियकर हरिदास कुंडलिक देवचे (वय 28) त्याच्यावर पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास आणि सुषमा यांच्यात मागील काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्याच कारणावरून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना सोमवारी घडली.

मयत सुषमा ही शिक्रापूर येथील एका रुग्णालयात नर्स होती. तर हरिदास हा चाकणच्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला होता. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर सुषमा यांचा जागीच मृत्यू झाला तर हरिदास हा बेशुद्ध अवस्थेत घटनास्थळी सापडला. दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.