Pune News : विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहतूकीतील बदल स्थगित

एमपीसी न्यूज : : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम व दुहेरी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आले होते. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. (Pune News) वाहतूक बदलामुळे वाहनचालकांना वळसा घालून ओैधकडे जावे लागत होते. या भागातील अंतर्गत रस्त्यावर कोंडी होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.त्यामुळे वाहतूक बदल स्थगित करण्यात आले आहेत. तसेच या भागातील वाहतूक पूर्ववत करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी बुधवारी सायंकाळी दिले.

वाहतूक पूर्ववत केल्याने वाहनचालकांना नेहमीप्रमाणे विद्यापीठ चौकातून ओैंधकडे जाता येणार आहे. विद्यापीठ चौकात मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करण्यात आल्याने शनिवारपासून (11 फेैब्रुवारी) बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर वाहतूक बदल करण्यात आले. त्यामुळे बाणेर आणि ओैंध रस्त्याने येणारी विद्यापीठ चौकात येणारी वाहने विना सिग्नल डाव्या मार्गिकेने शिवाजीनगरकडे जात होती.

Pune News : ‘एल्गार परिषद’ प्रकरणात उत्कृष्ठ तपासासाठी डॉ. शिवाजी पवार यांचा गौरव

ओैंधकडे जाणारे वाहनचालक अभिमानश्री सोसायटीतून वळून बाणेर फाटा चौकातून पुन्हा विद्यापीठ चौकात येत होते. विद्यापीठ चौकातून वळून पुन्हा वाहनचालकांना ओैंधकडे जाण्याची मुभा देण्यात आली होती. या भागातील वर्तुळाकार वाहतूक योजनेमुळे अभिमानश्री सोसायटी परिसरात वाहतूक कोंडी होत होती. वाहनचालकांना वळसा घालून जावे लागत हाेते. वाहतूक बदलांमुळे वाहनचालकांनी तक्रारी केल्या होत्या. (Pune News) त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी बुधवारी (15 फेब्रुवारी) सायंकाळी या भागातील वाहतूक बदल स्थगित केले. या भागातील वाहतूक पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.