Pune News : कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांनी पुण्याकडे लक्ष द्यावे : आमदार सिद्धार्थ शिरोळे

गेले 4 ते 5 दिवसांपासून कोरोना रुग्णांची खूप गैरसोय होत असून त्यांच्यावर नीट उपचार केले जात नाहीत. सुविधांच्या अभावी COEP कोविड हॉस्पिटलमधून मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण Discharge घेत आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 97 हजार रुग्ण झाले आहेत. त्यामध्ये 15 हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे दोन हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

200 कोटी रुपये खर्च करुन उभारलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून Critical कोरोनाबाधितांवर उपचार करणे अधिक सोपे व जलद होईल, असा विश्वास सर्व पुणेकरांना होता. परंतु, आज विश्वासघात झाल्याची भावनाही पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.

गेले 4 ते 5 दिवसांपासून कोरोना रुग्णांची खूप गैरसोय होत असून त्यांच्यावर नीट उपचार केले जात नाहीत. सुविधांच्या अभावी COEP कोविड हॉस्पिटलमधून मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण Discharge घेत आहेत.

आज @TV9Marathi च्या पांडुरंग रायकर या तरुण पत्रकार मित्राचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. राज्य सरकारने लवकरात लवकर या गोष्टींकडे लक्ष नाही दिले तर असेच दुर्दैवी मृत्यू होत राहतील, असे आमदार शिरोळे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील आरोग्य सेवेत लक्ष घालावे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मुक्काम ठोकून दैनंदिन आढावा घेऊन वैद्यकीय यंत्रणा मार्गी लावण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही शिरोळे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.