Pune News: स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र

एमपीसी न्यूज: महापालिकेचा समाज विकास विभाग आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकार्याने स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या योजनेअंतर्गत सावित्रीबाई  फुले विद्यापीठाअंतर्गत केंद्रात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणात प्रवेश देण्यासाठी लवकरच वर्तमानपत्रात जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात येतील. अर्जदारांची निवड प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. मागासवर्गीय गटातील शंभर आणि खुल्या गटातील पन्नास विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षांचा राहणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शुल्क प्रत्येकी सतरा हजार रुपये महापालिकेच्या वतीने भरण्यात येणार आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त दोन वेळा लाभ घेता येईल. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या  गरीब, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेचा निश्चित लाभ होऊ शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.